Skip to content
+91-7796342684
+91-8888252577
help@mavalakolhapur.com
Menu

80G Reg. No : AAOCM7515KF20221

12A Reg. No : AAOCM7515KE20221

Welcome To Mavala Kolhapur

Learn More

Welcome To Mavala Kolhapur

Mavala Kolhapur is a platform formed by well-cultured and well educated youth in all constituent 

Learn More

वारसा विचारांचा कृती जाणिवतेची

Health

Health

Education

Education

Human Rights

Human Rights

Child Protection

Child Protection

Homelessness

Homelessness

Mavala Kolhapur

             शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा वैचारिक वारसा जोपासत करवीर नगरी कोल्हापूर मध्ये शिक्षण नोकरी व्यवसाय उद्योग शेती आणि रोजगार या माध्यमातून सक्षम समाज घडविण्याचा प्रयत्न मावळा कोल्हापूर संघटनेच्या माध्यमातून आपण करत आहोत. विविध सामाजिक उपक्रमांतून, कार्यक्रमातून शिव-शंभू ,फुले शाहू, आंबेडकर यांचा विचार समाजात पोहोचविण्यात नेहमीच प्रयत्नशील असतो. दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त आपण विविध उपक्रम राबवत असतो.
शिवजयंती 19 फेब्रुवारीला एकाच दिवशी साजरी झाली पाहिजे यासाठी स्वखर्चातून शिवछत्रपतींच्या 200 पुतळयांचे वाटप.12 तासात 10 फूट उंच शंभूराजेंची मूर्ती साकारण्याचा संकल्पना, प्रबोधन करणारे ऐतिहासिक महानाट्याची सुरुवात, शिवछत्रपती व महाराणी ताराराणी यांचा होणारा रथोत्सव हा लोकोत्सव व्हावा यासाठी प्रयत्न करणारी संघटना म्हणजे मावळा कोल्हापूर.
           महापूरात लोकांना पूरपरिस्थीतून बाहेर काढणे, जनावरांना बाहेर काढणे, पूरग्रस्तांसाठी जेवणाची सोय, आदिवासी पाड्यांवर जाऊन लोकांना मदत, ‍विदर्भ मराठवाड्यातील मावळ्यांनी पाठविलेले अन्नधान्य, जनावरांचा चारा पूरग्रस्त लोकांना वाटला, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात महापूरात अडकलेल्या लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, महानगरपालिकेला आरोग्य साहित्याची मदत, पूरग्रस्तभागात जाऊन लोकांची आरोग्य तपासणी, पूर ओसरल्यानंतर स्वच्छता करण्यात मदत.
राजर्षी शाहू राजांनी उभा केलेल्या पहिल्या मराठा विद्यार्थी वस्तीगृहात कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णांसाठी ऑक्सीजन बेडचे हॉस्पीटल उभा केले. सरकारने जाहीर केलेल्या निम्म्या किमतीत रुग्णांना उपचार दिले. त्यामध्ये गरजू रुग्णांना सर्व सोयी सुविधा पुरविल्या. शंभरहून अधिक कोव्हिड रुग्ण बरे केले. कोव्हिड काळात अडचणीत असणाऱ्या वारांगनाना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. लोककलावंत, शाहीर, पत्रकार यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना मदत पोहचविण्याचे कार्य मावळ्यांनी केले.
आरक्षणासाठी, महागाई विरोधात, महापुरुषांच्या बदनामी विरोधात, शेतकरी आंदोलनात मावळा कोल्हापूरने रस्त्यावर उतरून आंदालने केली. दुर्गम भागातील शाळांना संगणक, वह्या पुस्तके, दप्तरे अशी मदत मावळ्यांनी दिली. शासकीय शाळातील मुलांना पिण्याचे शुध्दपाणी मिळावे म्हणून पाण्याच्या टाक्या बसवल्या. अनेक तरूणांना आण्णासाहेब पाटील महामंडळातून आर्थिक सहाय्य मिळवून दिले.
                  ज्येष्ठ शोध पत्रकार निरंजन टकले लिखित ‘न्यायाधीश लोयांचा खुनी कोण ?’, कॉम्रेड उमेश सुर्यवंशी लिखित सावित्रीमाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सावी’, महात्मा गांधी यांच्याविषयी ‘निर्भय’, प्रबोधनकार ठाकरे यांच्या विषयी ‘कोदंण्ड’ या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मावळा कोल्हापूरने पुढाकार घेतला.
सामाजिक कार्य करत असताना अनेकजण कुटुंबाकडे, नोकरी, व्यवसायाकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे आर्थिक अडचणी येतात. यातून तरुण नैराश्यात जातात,मानसिक,आर्थिक, कौटुंबिक स्वास्थ्य बिघडते आणि उमेदीच्या काळात अनेक चुका त्यांच्या हातून घडतात. त्यामुळे संघनेत काम करत असताना प्रथम नोकरी, व्यवसाय, उद्योग यातून सक्षम होणे, कुटुंबाला प्राधान्य देणे मग संघटनेसाठी, समाजासाठी वेळ देणे हाच विचारांचा वारसा मावळा कोल्हापूर जपत आहे.
                 शाहू मिलशी लोकांचा कनेक्ट रहायला पाहिजे म्हणून राजर्षी शाहू राजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त मावळा कोल्हापूरने स्वखर्चातून भोंगा खरेदी केला आणि तो वाजवला. कळंबा तलाव येथील शाहूकालीन बंधारा सर्व मावळ्यांनी स्वच्छ केला. बळीराजा महोत्सव, रंकाळा तलाव येथे लोकसहभागातून स्वच्छता, चैत्र यात्रेनिमित्त जोतिबा मंदिर येथे स्वच्छता, शाहू मिलमध्ये स्वच्छता, नवरात्रौत्सवात अंबाबाई मंदिरातील सुरक्षा रक्षकांना जेवणाची सोय, जिजाऊ जयंतीनिमित्त दुर्गम भागातील महिलांना साडी व जीवनावश्यक वस्तूंची मदत, स्मशानभूमीस शेणी दान, कोव्हिड काळात अनेक गरजूंना अन्नधान्याच्या कीटचे वाटप, महापुरामुळे हायवेवर, एस टी स्टॅण्डवर अडकून बसलेल्या लोकांना जेवणाची सोय अशा अनेक सामाजिक कार्यात मावळा कोल्हापूर अग्रेसर असते.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते मानाचा मावळा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्याची परंपरा चालू केली. २०२० वर्षी गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून आपल्या स्वतःच्या शेतात शाळा बांधून सुरू केल्याबद्दल करवीर तालुक्यातील गणेशवाडी गावचे श्री. नामदेव यादव सर, २०२१ वर्षी कोव्हिड आपत्तीत निस्वार्थी सेवा देणाऱ्या पुण्यातील जंगम कुटुंबीय, २०२२ वर्षी ज्येष्ठ शोध पत्रकार निरंजन टकले, २०२३ वर्षी ज्ञानतपस्वी, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह साळुंखे सर यांना आतापर्यंत पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यांच्या शिवजयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम, महानगरपालिका महिला स्वच्छता कामगार, कोव्हिड काळात चांगली ‍सेवा दिल्याबद्दल डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांचा सत्कार ‍करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्याचे काम मावळा कोल्हापूरने केले.

Home

Why Us Mavala Kolhapur

Start Changing Lives

Start Changing Lives

Home
Support Hopeful

Support Hopeful

Home
Volunteers For People

Volunteers For People

Home

Why Us Mavala Kolhapur

Start Changing Lives

Start Changing Lives

Support Hopeful

Support Hopeful

Volunteers For People

Volunteers For People

DONATION

Your donation will benefit some others

BECOME A VOLUNTEER

Join your hand with us for a better life and beautiful future.

Donate Using any UPI App Together we can and Together we will !!!

Donation Covered u/s 80G & 12A of Income Tax Act
Mavala Kolhapur

Instructions :

  1. Open any UPI app.
  2. Scan the code shown in image
  3. Enter the donation amount
  4. Enter your UPI Pin
  5. Wait till the transaction is complete
  6. Congratulations you have successfully completed your payment.